जिथे शिक्षकांचा सन्मान तिथे देशाची प्रगती – सुधीर तांबे :

भुसावळ – संविधानानुसार प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण मिळायला पाहिजे आज 8 वी पर्यंत मोफत असलेले शिक्षण 12 वी पर्यंत मिळाले पाहिजे. गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शाळांना पायाभूत सुविधा दिल्या पाहिजे. भारतातील उच्च शिक्षण प्रणाली उत्तम असून परदेशातील विद्यार्थी आपल्या देशात शिक्षणासाठी येतात परंतु पायाभूत शिक्षणावरती लक्ष देणे गरजेचे आहे शिक्षण संस्थांना अनुदान दिले जात नाही त्यामुळे पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध करता येत नाही जिथे शिक्षकांचा सन्मान आहे तिथे देशाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही असे प्रतिपादन पदवीधर मतदारसंघाचे आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले .

रोक्लब ऑफ भुसावळ ताप्ती च्या वतीने सन्मान गुरुवर्यांचा या कार्यक्रमात सहा तालुक्यातील 21 शिक्षकांचा गौरव करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष डॉ. संजू भटकर होते प्रमुख पाहुणे म्हणून पदवीधर मतदार संघाचे आ. डॉ. सुधिर तांबे आ. संजय सावकारे उपजिल्हा अधिकारी प्रवीण महाजन सोसायटीचे माजी अध्यक्ष तुकाराम बोरोले, सेक्रेटरी जीवन महाजन, सन्मान गुरूवरयांचा कार्यक्रमाचे समन्वयक योगेश इंगळे सहसमन्वयक प्रदीप सोनवणे आदी उपस्थित होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपप्रज्वलन करून डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले या नतर प्रा. आर बी इंगळे यांनी ईशस्तवन सादर केले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात योगेश इंगळे यांनी भुसाळ रोटरी क्लब च्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती देत शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी सन्मान गुरुवरयांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले

ऑनलाइन च्या काळात शिक्षकाची किंमत
वर्गात शिक्षण घेणे व शिकवणे हे गम्मतच वेगळी आहे ऑनलाइन शिक्षणात तंत्रज्ञान कितीही पुढे गेले असले तरी खरे ज्ञान वर्गातच मिळत असते राष्ट्रनिर्मितीसाठी शिक्षकांचा महत्त्वाचा हातभार असून देशप्रेम प्रत्येक विद्यार्थ्यामधे रुजवले गेले पाहिजे
अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. संजू भटकर यांनी सांगितले की येणाऱ्या काळात शिक्षक व विद्यार्थी त्यांच्यासाठी चांगले कार्य करण्यासाठी क्लबच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतील तसेच वंचित शाळांपर्यंत पोहोचुन त्यांना मदत करण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी तर आभार प्रदीप सोनवणे यांनी मानले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी एम आर चौधरी प्रशांत नरवाडे राहुल सोनार समाधान जाधव मीना नेरकर मनिषा पाटील माजी नगरसेवक राजु आवटे डॉ. वंदना वाघचौरे बापू चौधरी
यांचा झाला गौरव –

जिल्हा परिषद विभाग

नारायण विठ्ठल कुंभार (कोळन्हावी, यावल), विजय रामगिर गोसावी (कुसुंबे,रावेर),रविंद्र पांडुरंग चिंचपुरे (शेवगे पिंपरी, जामनेर), रामचंद्र शंकर काळे (वाकी,बोदवड), दिपाली बापू पाटील (साकरी, भुसावळ), ममता सिकंदर तडवी (काहूरखेडे,भुसावळ), गणेश यशवंत कोळी (चिंचखेडे बू, मुक्ताईनगर), काजी एजाजुद्दिन खलीलूद्दीन ( यावल ),

माध्यमिक विभाग

नितीन भास्कर झांबरे (अ.ध. चौधरी विद्यालय व ज्यु. कॉलेज डोंगर कठोरा,यावल), विजय राजकुमार मंगलानी ( आर.एस.आदर्श हायस्कूल, भुसावळ ), सुभाष रामदास महाजन ( सरदार जी.जी. हायस्कूल अॅण्ड ज्यु.कॉलेज, रावेर), हेमंत सुधाकर देशपांडे ( शिवाजी हायस्कूल, मुक्ताईनगर ), सुरेंद्र अशोक पाटील ( गो.द. ढाके विद्यालय, एनगाव,ता. बोदवड ), सुरेश आनंदा सुरवाडे ( न्यु.इंग्लीश स्कूल, जामनेर), खाजगी प्राथमिक विभाग जियाउन्नबी मोहिबुर रहमान शेख ( अलहिरा उर्दु प्राथ. शाळा भुसावळ ), राजकुमार लिलाचंद जैन ( श्री शिवप्रतीष्ठान रावेर संचलीत सरस्वती विद्या मंदिर, रावेर), ज्ञानेश्वर हरिदास चौधरी( राष्ट्रीय शिक्षण संस्था, बोदवड )

महाविद्यालय विभाग

प्रा. डॉ. अविनाश एन. सोनार ( श्री.व्ही.एस नाईक कॉलेज, रावेर), प्रा.नंदन वसंतराव वळींकार( अ.ध. चौधरी विद्ायालय व ज्यु कॉलेज, डोंगरकठोरे ,यावल ), डॉ.प्रा.भाग्यश्री शैलेंद्र भंगाळे ( पी.ओ. नाहाटा कॉलेज भुसावळ )