पुणे : दिड वर्षांपासून कामाला असलेल्या पश्चिम बंगालमधील कारागीराने 25 लाखांची सोन्याची लगड घेवून पोबारा केल्याची घटना पुण्यात घडली.

. तक्रारदार सचिनंदन धरणी पाल (56, रा. रास्ता पेठ) यांचे रविवार पेठेतील पालगोल्ड स्मिथ या नावाने सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. त्यांच्याकडे पाल बादलजाना (वय 27, रा. गोपीनाथपूर, पूर्व मिदनापूर, प. बंगाल) हा कारागीर गेल्या दीड वर्षापासून कामाला होता. तो त्यांच्याकडेच राहात होता. पाल यांच्याकडे शहरातील एका नामांकित सराफ पेढीतून दागिने बनविण्याचा ऑर्डर आली होती.याकरीता कारखान्यावर काम करणार्या पाल या कारागीराला दागिने बनवण्यासाठी सोने दिले असता तब्बल 25 लाख 55 हजार रुपयांची सोन्याची लगड घेऊन कारागीर पसार झाला.


