जळगावात राष्ट्रवादी महिला काँग्रेस महिला आघाडीतर्फे गॅस दरवाढ विरोधात आंदोलन ;

जळगाव –
राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष जळगाव व महानगर महिला आघाडीतर्फे गॅस दरवाढ विरोधात प्रदेशाध्यक्ष रुपाली यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले.
यावेळी शास्त्री टॉवर चौक पासुन ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत गॅस दरवाढ विरोधात केन्द्र सरकारचा निषेध म्हणून रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड भैय्यासाहेब रविंद्र पाटील, महीला जिल्हाध्यक्षा सौ. वंदना चौधरी , जिल्हा महानगर अध्यक्षा सौ. मंगला पाटील, वाल्मीक पाटील, राजेश पाटील, अशोक पाटील, विलास पाटील, अनिरुध्द जाधव, रिजवान खाटीक, मजहर पठाण, रहीम तडवी, सुशील शिंदे, विशाल देशमुख, मिनाक्षी चव्हाण, दिपीका भामरे, सौ संगिता भामरे, सायायबिन पटेल, सुनीता सूर्यवंशी, आशाताई येवले, व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते .