कोळसा वाहून नेणार्‍या मालगाडीचे 22 डबे घसरले: शिराळाजवळील घटना : काही गाड्या रद्द तर काही अन्य मार्गाने वळवल्या :

अमरावती : कोळसा वाहून नेणार्‍या मालगाडीचे 22 डबे घसरल्याची घटना रविवारी सकाळी 7 वाजता अमरावती ते नरखेड रेल्वे मार्गावरील वलगाव नजीकच्या शिराळा येथे हा अपघात झाला. अकोला येथून मालगाडीचे डबे उचलण्यासाठी क्रेन मागविण्यात आली आहे.

बडनेरा, अमरावती येथील रेल्वे अधिकारी, कर्मचार्‍यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून या अपघातामुळे नरखेड- काचीगुडा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली तर या मार्गावरून धावणारी जयपूर ते सिकंदराबाद एक्स्प्रेस दुसर्‍या मार्गाने वळविण्यात आली आहे.