भुसावळ – वंचित बहुजन आघाडीच्या माजी जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ संगीता राजेंद्र भामरे यांनी वंचितला सोडचिठ्ठी देत नुकताच भुसावळ नगरीचे शिल्पकार माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे .

सौ संगीता भामरे यांना लवकर जिल्ह्याची महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात येणार असल्याचे संकेत यावेळी वरीष्ठांनी दिले .
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे युवा सभापती सचिन चौधरी यांचेसह , राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ नंदा निकम ,तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


