भुसावळ :- रेल्वे स्टेशन आवारातील लोहमार्ग पोलीस स्टेशनला दुपारी रेल्वे सुरक्षा बल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वे गाडीत जबरी चोरी करीत असतांना आरोपीस ताब्यात घेऊन लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले होते.सायंकाळी आरोपी अचानक भुसावळ लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्याला भुरळ घालून पोलीस स्टेशन मधून पसार झाल्याची घटना घडल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.

अधिक माहिती अशी की,दिनांक १/८/२०२१ रोजी प्रवाशांच्या सामानाची होणारी चोरी थांबविण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल भुसावळ स्टेशन निरीक्षक आर.के मीना.पी. एल.टी. टीम चे स.उ.नि. प्रेम चौधरी व आ.वसीम शेख, विनोद कुमार,नागेश धनवटे हे 01:30 वाजेला भुसावळ स्टेशन वरील फलाट नंबर 6 वर एक संशयास्पद इसमाला फिरत असतांना ताब्यात घेतले.व संशयित इसमाला रेल्वे सुरक्षा बल कार्यालयात आणले.इसमांची विचारपूस केली असता नाव हसन रजा उर्फे इब्राहिम शेख वय 20 राहणार अलीपुर,महेशपूर,मालदा (पश्चिम बंगाल ) असे सांगितलदर इसमांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक सैग बॅग मिळून आली. त्याबाबत विचारणा केली असता समाधानक़ारक उत्तर न मिळाल्याने सैग बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये प्रवाशांचा सामान मिळाला.एक लाल रंगाचा लहान लेडीस पर्स,त्यामध्ये कानातील सोन्याचे झुमके 5 ग्रॅम, कानातील सोन्याची बाली, सोन्याची चैन व पेंडल 8 ग्रॅम, 2 सोन्याच्या अंगठ्या 10 ग्रॅम, सोने व चांदीची बांगड्या 8 ग्रॅम, सोन्याचे कंगण 2 ग्रॅम, सोन्याचे काबाजूबंद 2 ग्रॅम,चांदीची तोड्या,सोन्याचे नाणे 10 ग्रॅम,2 चांदीचे जोडवे,चांदीची कमरेची चैन,सोन्याचे कानातील झुमके 4 ग्रॅम, सोन्याचे पेंडल 2 ग्रॅम, एक चांदीची चैन व पेंडल, चांदीची अंगठी, एक बेंटेक्स चे मंगळसूत्र व रोख 2,000 हजार रुपये असे लेडीस पर्स मध्ये मुद्देमाल मिळून आला.भुसावळ रेल्वे स्टेशनला येण्याच्या दोन ते तीन तास आधी चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली.
भुसावळ रेल्वे स्टेशनवर संशयास्पदरित्या एक इसम प्लॉटफॉर्म नंबर 2 वर उभी असलेल्या गाडी क्रमांक 02834 अपच्या एस-7 कोचच्या खिडकीमधून दुसरी ग्रे रंगाची लेडीस पर्स चोरी केल्याची कबुली दिली.एक ग्रे रंगाची लेडीस पर्स 500 रुपये किंमतीची,एक विवो कंपनीचा प्रो -5 मोबाईल, 2 आधार कार्ड,2 नग चष्मे,3470 रुपये रोख तसेच 9 मोबाईल ओप्पो कंपनी डार्क ग्रीन,ओप्पो कंपनी काळे रंगाचा,सैमसंग कंपनी निळे रंगाचा,सैमसंग कंपनी काळे रंगाचा,रियल कंपनी नेवी ब्ल्यू रंगाचा,विवो कंपनी लाईट ब्ल्यू रंगाचा,रेडमी कंपनी सिल्वर रंगाचा,रेडमी कंपनी काळा रंगाचा,विवो कंपनी स्काय ब्ल्यू रंगाचा असे 9 मोबाईल गाडी क्रमांक 02834 मधून वेगवेगळ्या कोच मधून चोरी केल्याची कबुली दिली.तसेच एक ब्राऊन रंगाची जेन्ट्स पर्स मधून 6475 रुपये रोख मिळून आले असे एकूण प्रवाशांचा चोरी गेलेला अंदाजे 2,88,345 रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपी कडून हस्तगत केला आहे.
सदर चोरी झालेल्या घटनेची माहिती रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक आर.के.मीना यांनी नंदुरबार मार्गरक्षी पार्टी इंचार्ज यांना देऊन गाडी क्रमांक 02834 मधील कोच अटेंड करून एस -7 मधून प्रवास करणारे प्रवाशी गौतम भिकमचंद छाजेड यांनी अमळनेर लोहमार्ग पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तसेच एस -4 कोच मधील प्रवाशी दशरथ मंडल यांनी लोहमार्ग पोलीस स्टेशन नंदुरबार येथे तक्रार दिली.तसेच प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांनी चोरी बाबत आय.पी.एफ/एस.टी व आय.पी.एफ / बी.आर.सी. यांच्या संपर्क साधून सुरत व बडोदरा मध्ये अधिकाऱ्यांनी संपर्क साधला.त्याचप्रमाणे 9 चोरी गेलेले मोबाईचे मालक मिळून आले नाही.आरोपीला पुढील कारवाई साठी भुसावळ लोहमार्ग पोलीस स्टेशनकडे सुपूर्त केले आहे.भुसावळ लोहमार्ग पोलीस स्टेशनला आरोपी विरुद्ध गुरुन 376/2021 कलम 379 प्रमाणे दाखल करण्यात आले असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.तसेच लाल रंगाचा लेडीस पर्स बाबत लोहमार्ग पोलीस स्टेशन शेगाव येथे गुरन 67/2021 कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदर गुन्ह्यातील जबरी चोरीतील आरोपीस 31/7/2021 रोजी रेल्वे गाडीमध्ये चोरी करीत असतांना रेल्वे सुरक्षा बल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री ताब्यात घेतले होते .दिनांक 1/8/2021 रोजी दुपारी आरोपीस रेल्वे सुरक्षा बल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भुसावळ लोहमार्ग पोलीस स्टेशनला आणून त्यांच्या स्वाधीन केले होते. दिनांक 1/8/2021 रोजी सायंकाळी आरोपी हुसेन शेख इब्राहिम शेख अलीपुर मालदा येथील असून अचानक लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात भुरळ घालून पसार झाल्याने लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.आरोपीच्या शोधासाठी लोहमार्ग पोलीस अधिकाऱ्यांनी चार पथक तयार करून शहराच्या चार दिशेने रवाना केली होती.भुसावळ शहरातील सातारा भागात आरोपी असल्याची खात्रीदायक माहिती हाती लागताच पथक घटनास्थळी त्वरित रवाना होऊन एक ते दीड तासांनी आरोपीला भुसावळ लोहमार्ग पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आले.Tत


