भुसावळ नहाटा वाणिज्य महाविद्यालयातकारगिल विजय दिवस साजरा :

भुसावळ – कला, विज्ञान आणि पी ओ नहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथे आज 26 जुलै कारगिल विजय दिवस निमित्त कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला आणि शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन एनसीसी तर्फे मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी अठरा महाराष्ट्र बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रवीण धीमन हे उपस्थित होते त्याचबरोबर अठरा महाराष्ट्र बटालियन संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. सोबत प्राचार्य डॉक्टर मिनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉक्टर एस व्ही पाटील, उपप्राचार्य डॉक्टर बी एच बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉक्टर एस. डी. गोस्वामी आणि उपप्राचार्य डॉक्टर एन. ई. भंगाळे, शहीद राकेश शिंदे यांचे मोठे भाऊ श्री सुरेश शिंदे हेदेखील उपस्थित होते. याप्रसंगी कर्नल प्रवीण धीमन यांनी एनसीसी च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना भारतीय सैन्य तर्फे करण्यात येणाऱ्या महान बलिदानाची कल्पना करून दिली. कर्नल प्रवीण धीमन यांचे लहान भाऊ स्वतः कारगिल युद्धामध्ये शहीद झालेले आहेत म्हणून त्यांनी सर्व मुलांना कारगिल युद्ध मध्ये काय काय घडले व पाकिस्तानने भारतावर कसे आक्रमण केले आणि भारताने हा लढा कसा परतवून लावला याबद्दल पूर्ण मार्गदर्शन केले. याप्रसंगी कॅप्टन स्मिता चौधरी, लेफ्टनंट दीपक पाटील उपस्थित होते. शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना देण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.