गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक तयार करणार – वरणगावात शिवसंपर्क अभियान प्रसंगी प्रभाग सात, आठमध्ये जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांची ग्वाही

वरणगाव – शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांचे कार्य सामान्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा असे आवाहन करीत गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक मी तयार करणार अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांनी वरणगाव येथील प्रभाग क्रमांक सात आणि आठ मध्ये शिव संपर्क अभियान कार्यक्रम प्रसंगी शनिवारी रात्री उपस्थित कार्यकर्त्यांना दिली.
व्यासपीठावर शिवसेना जिल्हा कार्यालयीन उप प्रमुख उत्तमराव सुरवाडे, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफर अली उर्फ हिप्पी सेट, तालुका उपप्रमुख सुभाष चौधरी, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक सईद मुल्लाजी, अब्रार खान यांची उपस्थिती होती.
जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांनी पुढे सांगितले की, वरणगाव शिवसेनेला पोषक वातावरण आहे शिवसेनेमध्ये तरूणांचा प्रवेश वाढत आहे, मुस्लिम समाजाने साथ दिल्यास येत्या निवडणुकीमध्ये वरणगाव नगरपालिकेवर ती भगवा फडकला शिवाय राहणार नाही, त्याला कारण असे की राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या कार्य आपण सर्व महाराष्ट्र बघत असल्याचेही महाजन यांनी सांगितले. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांची साथ तसेच मुक्ताईनगर चे कार्यसम्राट आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची घोडदौड भुसावळ तालुक्यात सुरू आहे त्याचबरोबर वरणगाव शहरात आपणा सर्वांच्या सहकार्याने व जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने भगवा फडकवण शक्य आहे
प्रा उत्तमराव सुरवाडे यांनी देखील शिवसेनेमध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद वर्णभेद पंथभेद मानला जात नाही. इथे फक्त एकच शिवसैनिक हीच आपली जात धर्म कोणत्याही समाजाचा माणूस शिवसेनेमध्ये मोठ्या पदावर जाऊ शकतो. त्यामुळे शिवसेनेमध्ये काम करण्याची चिकाटी तरुणांनी धरायला पाहिजे. येणाऱ्या काळात वरणगाव नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेच्या माध्यमातून जनतेचे कामे करा असेही प्रा सुरवाडे यांनी सांगितले. सईद मुल्ला सुभाष चौधरी, सुरेश चौधरी, अब्रार खान यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी प्रभाग क्रमांक सात आणि आठ मधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत.


