चाळीसगाव – चाळीसगाव तेली समाजातर्फे माजी ऊर्जामंत्री व तेली समाज भूषण चंद्रशेखर बावनकुळे यांचा शुक्रवार रोजी तेली समाज मंगलकार्यालय चाळीसगाव येथे सर्व समाज बांधवांच्या उपस्थित भव्य सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला चाळीसगावचे आमदार मंगेश दादा चव्हाण चाळीसगाव तेली समाज अध्यक्ष दिलीप चौधरी तालुका तेली समाज अध्यक्ष सुरेश आण्णा चौधरी या सर्वांच्या उपस्थित मान्यवरांचा सत्कार झाला . या सत्कार प्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले मी ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचं ऋण माझ्यावर आहे आणि ते ऋण फेडण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असतो तसेच चाळीसगाव तेली समाजाने हे जे भव्य मंगल कार्यालय बांधले आहे या मंगल कार्यालयसाठी मला जे जे करता येईल ते मी माझ्या परीने करेल तसेच आमदार मंगेश चव्हाण यांच्याही आमदार फंडातून विशेष फंडातून काही करता आले तर त्याचाही सूचना मी देईल तसेच त्यांनी आश्वस्त केले की आज अत्यंत घाईत असल्यामुळे तुमच्याकडे जेव्हा एखादा मोठा कार्यक्रम होईल त्यावेळेस मी पूर्णवेळ पूर्ण दिवस तुम्हाला देईल व त्यावेळेस खूप गप्पा करुया सत्काराचा मी खूप आभारी आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चाळीसगाव तालुका तेली समाजाचे सेक्रेटरी बापू गुरुजी यांनी अतिशय सुनियोजित शब्दात केले तसेच चाळीसगावातील भारतीय जनता पार्टीचे गटनेते राजू अण्णा चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर माननीय सदानंद चौधरी ,पत्रकार आर डी चौधरी, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष शिरपूर नगरीचे बबनराव चौधरी उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चाळीसगाव तेली समाज चाळीसगाव कार्यकारिणी व समाज बांधव उपस्थित होते


