जळगाव : मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासत मामानेच आपल्या भाचीवर अत्याचार केल्याची घटना शहरात घडली. या प्रकरणी आरोपी मामा विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. मध्यप्रदेशातून आलेली 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईकांसह राहते मात्र नात्याने मामा असलेल्या आरोपीने भाचीवर चाकूचा धाक दाखवत अत्याचार केल्याची संतापजनक घटना आठ दिवसांपूर्वी (तारीख माहित नाही) घडली. घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देवून शिवीगाळ व मारहाण केली.

याप्रकरणी संशयीत आरोपी विरोधात गुरूवार, 22 जुलै रोजी तक्रार दिल्यावरून तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत आरोपीला तालुका पोलीसात रात्री अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कल्याण कासार करीत आहे.


