खिर्डी येथे बेकायदेशीररित्या तलवार बाळगणारा तरुण निभोंरा पोलिसांच्या ताब्यात ;

सावदा – जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिर्डी ( खुर्द ) या खेड्यात राहणाऱ्या हेमंत इच्छाराम भंगाळे वय २४ यांनी कायद्याचा कोणताही धाक न ठेवता थेट स्वतःजवळ एक लोखंडी मोठी तलवार अवैधरित्या बाळगतांना पोलिसांना दि.१९ जून २०२१ रोजी मिळून आला. म्हणून त्यास पोलिसांनी तलवार सह ताब्यात घेतले

त्याच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल जाकीर पिंजारी यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गु.र.नं.९७/२१ आर्म ॲक्ट ४/२५, व महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम ३७(१),(३) याचे उल्लंघन केलं केल्याने कलम १३५ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केलेली आहे तसेच सदरील आरोपीला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे
ह्या संदर्भात पुढील कारवाई व तपास काम सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अन्‍वर तडवी, पोलीस कॉन्स्टेबल साजिद शेख, स्वप्नील पाटील, संदीप पाटील हे करीत आहे.