( हर्षल पाटील याज कडून )
खंडाळा ता. भुसावळ –
खंडाळा परिसरातील किन्ही, मोंढाळा शिंदी, खंडाळा,साकरी, कुऱ्हा, या गावांमध्ये सर्रासपणे वीज वितरण कंपनीच्या नाकावर टिच्चून गेल्या अनेक वर्षापासून विज चोर आकडे टाकून विज चोरी करत आहे तर गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे हाताचे काम गेल्याने वीजग्राहकांना काम नसल्याने विज बिल हे भरता आले नाही त्यामुळे या परिसरात लाखो रुपयाची विज बिलाची थकबाकी झाली आहे ही वसूली करतांना काही दिवसांपूर्वी वीज कंपनी अधिकारी व कर्मचारी चोर सोडून संन्यासाला फाशी देत आहे. ज्यांचे विज बिल थकले आहे त्यांच्यावर सक्तीने विज कनेक्शन कट करून विज बिल आकारण्यात येत आहे व काहीही करून वीज भरा असा दम देत आहे.
या परिसरात वीज मीटर कमी व आकोडे विज चोरीचे अधिक प्रमाणात आहे या परिसरातील वायरमनला बिल थकले तर घरोघरी जाऊन वीज कट करायला वेळ आहे पण जे सर्रासपणे आकडे टाकून वीज चोरी करत आहे त्यांच्याकडे वायरमनचे लक्ष का जात नाही..? वीज चोरी करणाऱ्यांकडून हे वायरमन काही चिरीमिरी तर घेत नाही..? असा प्रश्न उपस्थित होत आहे कोरोनामुळे काम नसल्याने वीज ग्राहक विज बिल भरू शकत नाही असे ग्राहक सांगतात पण त्यांची विज कट केल्यावर ते पण वीज वितरण कंपनीच्या नाकावर टिच्चून सर्रास आकोडे टाकत आहे या परिसरात एकदाही वीज वितरण कंपनीचे भरारी पथक येत नसल्याने या परिसरात लाखो रुपयाची विज चोरी होत आहे
मात्र या विज चोरांचे कोणी काहीच करून घेत नाही मात्र विज बिल थकले तर लगेच त्यांची वीज कट करण्यात वीज वितरण कंपनी व वायरमन पुढे येतात पण या चोरी करणाऱ्या चोरांवर कारवाई करण्यासाठी का पुढे येत नाही तरी संबंधित वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांनी या परिसरात भरारी पथक नेमावे किंवा स्वतः येऊन या वीज चोरी करणाऱ्या वरती कायदेशीर गुन्हे नोंदवून कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील सुज्ञ नागरिक करीत आहे
वरिष्ठांचा आदेश आल्यावर विज चोरी करणाऱ्या वरती कारवाई करू आता सध्या असा कुठलाही आदेश नाही ज्यांच्याकडे बिल थकले आहेत त्यांचे विज कनेक्शन कट करण्यात येईल असे सध्या वरिष्ठांकडून सांगण्यात आले आहे. असे शिंदी प्रभारी अभियंता कुशवाह यांनी सातपुडा कन्या प्रतिनिधी यांचेशी बोलताना सांगितले



