भुसावळ –
येथील अॅड जगदीश गंगाधर भालेराव यांची नुकतीच जय मातृभुमि पक्षाचे तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे .
अॅड भालेराव यांची सामाजिक कार्यातील तसेच
समाज सेवेची आवड लक्षात घेवून तसेच त्यांचे आजपर्यंत तळागाळातील लोकांना सहकार्य करण्याची भावना व अन्यायाविरुध्द कायदेशिर संघर्ष
करण्याची वृत्ती स्वभाव तसेच मनमिळावू स्वभाव लक्षात घेवून त्यांच्या कार्याची दखल घेवून भुसावळ तालुकाध्यक्ष (ग्रामीण तालुकाध्यक्ष) पदी
नियुक्ती करण्यात आलेली आहे.

या निवडीबद्दल भुसावळातील व जिल्हयातील सर्व वकीलवृंद, सामाजिक
संस्था यांच्याकडून ॲङ भालेराव यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ॲङ जगदीश गंगाधर भालेराव यांची निवड पक्षाचे उपाध्यक्ष, अॅङ.योगेश दलाल, ॲङ श्री.सचिन कोष्टी, समाजसेवक, अशोक रघुनाथ मेढे आणि किरण जनार्दन बोलके यांनी केली असल्याचे
ॲङ भुपेश विश्राम बाविस्कर,
यांनी कळविले आहे .


