रेल्वे मालगाडीखाली आल्याने महिला चिरडून जागीच ठार ;


चाळीसगाव,

भुसावळाकडे जाणाऱ्या मालवाहू रेल्वेखाली चिरडली जाऊन २५ वर्षीय विवाहित महिला जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली आहे.

चाळीसगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म एकवरून उड्डाणपुलाच्या खालून भुसावळाकडे जात असताना मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेखाली प्रियंका मयूर शिळके (वय-२५ रा. जुना विमानतळ , चाळीसगाव) हि विवाहित महिला आल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची थरारक घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अपघात घडताच रेल्वे महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रेत ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले . प्रियंका हिच्या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पुढे गुन्हा दाखल करणे सुरू आहे.