लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपुर साप्ताहिक विशेष अतिजलद ट्रेनला मुदतवाढ –


भुसावळ –
रेल्वेने 05401/05402 लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपुर विशेष अतिजलद साप्ताहिक  एक्सप्रेस ट्रेनच्या सेवा विशेष शुल्कासह वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशिल पुढील प्रमाणे दिलेल्यानुसार यात –

05401 गोरखपुर – लोकमान्य तिलक टर्मिनस विशेष अतिजलद साप्ताहिक ट्रेन सेवा दि.  १४.७.२०२१ पासून ०४.०८.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. 
05402 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपुर विशेष अतिजलद साप्ताहिक ट्रेन सेवा दि. १६.७.२०२१ पासून ०६.०८.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.  
या वाढीव फेऱ्या विद्यमान संरचना, वेळ आणि मार्गावर चालविण्यात येतील. 
आरक्षण : 05402 या विशेष गाडीच्या वाढीव फेऱ्यांचे विशेष शुल्कासह आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर दि. १६.७.२०२१ पासून सुरू होईल. 
वरील अतिजलद विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.
बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकष, एसओपीचे पालन अनिवार्य असलेल्या या अतिजलद विशेष ट्रेनमध्ये फक्त कंफर्म तिकीट असणार्‍या प्रवाशांनाच परवानगी दिली जाईल.

 — — – —