अमळनेर (प्रतिनिधी) –
धरणगाव ते चोपडा रोडने काही इसम त्याचे ताब्यातील पांढरे रंगाची स्विट कार मध्ये स्वताचे फायद्याकरीता गांजा हा मादक अमली पदार्थ कब्जात बाळगुन तिची वाहतुक करत आहेत बाबत गोपणीय माहीती मिळाले वरुन राकेश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर याचे मार्गदर्शनाखाली गांजा बाबत कार्यवाही करावयाच्या आवश्यक त्या स्रव साधनासह क्रियारिती अवलंबवुन चोपडा ते धरणगाव रोडवर हाटेल इंद्रायणी समोर रोडवर उभे राहुन वाहणे चेक करत असतानां दिनांक १२/०७/२०२१ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास धरणगाव कडुन चोपडा कडेस एक पांढरे रंगाची स्विप्ट कार क्रमांक एम. एच.01 बी.टी.0509 हि आली असता तिस व तिचे पुढे चालणारे मोटर सायकल स्वारासह पथकातील वरील नमुद अधिकारी व अमलदार यानी मोठ्या शिताफिने पकडुन त्यांना त्याची नावे विचारली असता 1) आकाश रमेश इंगळे य 22 रा. मरीमाता मंदीराजवळ एरंडोल 2) शकील खाँन अयुब खाँन वय 42 रा.इस्लामपुरा, कासोदा ता. एंरडोल जिल्हा जळगाव 3 ) सतिष बापु चौधरी वय 36 रा.मरीमाता मंदिराजवळ एरंडोल ता. एरंडोल जिल्हा जळगाव अशी असल्याचे सांगीतले. तसेच त्याचे ताब्यात 600000/- लक्ष रु. किंमतीचा 39 किलो 800 ग्रॅम वजनाचे 20 पाकिटे गांजा, 400000/- लक्ष रुपये किमंतीची एक स्विप्ट कार व 50,000/- रुपये कि. ची एक मोटर सायकल असा एकुण 10,50000/- रुपये किमंतीचा मुद्देमाल मिळुन आला होता.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक जळगाव प्रविण मुंढे . अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव सचिन गोरे , याचे सुचने वरुन व अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी, राकेश जाधव याचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, व त्याचे पथकातील सपोनि राकेश परदेशी , पोहेकॉ / किशोर पाटील, पोना मिलीद अशोक भामरे, पोकाँ सुर्यकांत साळुखे, पोकाँ अमोल पाटील, चालक मधुकर पाटील यानी केली आहे. वरिल नमुद तिन्ही आरोपीताना विरुद्द पोना मिलींद भामरे यानीं फिर्याद दिले वरुन गुरन 301/2021 ए.डि.पि.एस. कायदा कलम 8, 20, 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास श्री जयपाल हिरे, पोलीस निरीक्षक अमळनेर पोस्टे हेकरीत असुन आज रोजी 12.. तिनही आरोपींना न्यायलयात हजर केले असता न्यायलयाने तिघही आरोपींना दिनांक 17/07/2021पर्यंत 04 दिवस पोलीस कस्टडीचे आदेश दिले आहे.


