पाळधीजवळ भीषण अपघात : तिघांचा मृत्यू ;


जामनेर -चारचाकी दुचाकीवर आदळून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज 12 जुलै सोमवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील पाळधी गावा जवळ हा अपघात झाला.

या अपघातात दुचाकीवरील पंकज मोहन तायडे (वय 32) व धनंजय गंगाराम सपकाळे (वय 42, रा.स्टेट बँक कॉलनी, जळगाव) तसेच चारचाकी चालक प्रवीण प्रकाश पाटील (वय 38, भराडी, ता.जामनेर) यांचा मृत्यू झाला. शेंदुर्णीकडून फॉर्चून फायनान्स बँकेचे शाखा व्यवस्थापक धनंजय सपकाळे व सेल्स एक्झिक्युटिव्ह पंकज तायडे हे दोन्ही दुचाकी (एम.एच.19 डी.आर.1419) ने जळगावकडे येत असतांना जळगाहुन पहुरकडे जाणार्‍या चारचाकी (एम.एच.19 सीयु.7161) ने दुचाकीला जोरदार धडक दुचाकीवरील दोघांसह चारचाकी चालक ठार झाला. पाळधीजवळील बळीराजा ढाब्या जवळ हा अपघात झाला. अपघातस्थळी पहूर पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला.