जळगाव –
जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट होत असून गेल्या 24 तासात नव्याने कोरोनाचे 16 रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात 22 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 574 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 42 हजार 447 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 39 हजार 593 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. शनिवार रोजी आढळलेले रुग्ण

जलगाव शहर 04
जळगाव ग्रामीण 00
भुसावळ 04
अमळनेर 00
चोपडा 00
पाचोरा 00
भडगाव 00
धरणगाव 00
यावल 00
एरंडोल 00
जामनेर 00
रावेर 01
पारोळा 00
चाळीसगाव 07


