वरणगावात 157 तरुणांचा शिवसेनेत प्रवेश ;

  • मांडवेदीगरच्या एक ग्रा. पं. सदस्यासह 22 कार्यकर्त्यांचाही समावेश
  • शिवसेनेचा झंजावत वरणगावसह भुसावळमध्येही प्रत्येक वॉर्डात दिसेल : जिल्हाप्रमुख समाधान महाजन

वरणगाव –

शहरातील सिद्धेश्वर नगरातील प्रभाग क्रमांक 18 मधील 157 तरुणांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर तसेच मुस्लिम समाजाचे नेते जाफरअली मकसूदअली (हिप्पी शेठ) यांच्यावर विश्वास ठेऊन मंगळवारी सायंकाळी सिद्धेश्वर नगरात झालेल्या भव्य प्रवेश सोहळा कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश केला.

कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर होते. प्रमुख अतिथी जिल्हा नियोजन समिती सदस्य ऍड. मनोहर खैरनार, अल्पसंख्यांक जिल्हा प्रमुख अफसर खान, शिक्षक सेनेचे ईलीयास खान, कार्यालय प्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे सर, जिल्हा संघटक विलास मुळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे सर, भुसावळ शहरप्रमुख निलेश महाजन, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, पं. स सदस्य विजय सुरवाडे, ऍड. कैलास लोखंडे, मुस्लिम समाजाचे नेते हिप्पी शेठ, कस्तुराबाई सुरवाडे, योगिता सोनार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

संतोष सोनवणे, ईलियास सर, प्रा. उत्तम सुरवाडे, अफसर खान, ऍड.मनोहर खैरनार या सर्वांनी सांगितले की, राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कार्य आणि शिवसेना पक्षाचे काम हे संपूर्ण राज्यासह देशाने बघितले. उद्धव ठाकरे यांच्याकडे कुठलाही जातीभेद, पंथबेद नाही आहे. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करणारांची संख्या वाढत असल्याचे सांगितले.

जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी भाषनात आपल्या खास शैलीत 30 वर्षांपासून भाजपची सत्ता असूनही सत्ताधारी यांनी सिद्धेश्वर नगरचा दलित वस्ती निधी दुसरीकडे वढवून हा परिसर नुसता भकास करून ठेवला आहे. गेल्या पाच वर्षात इतक्या कोटीचे कामे केली म्हणता मंग या भागात लाईट, गटार, पाणी या मूलभूत सुविधा का मिळाल्या नाहीत? येथील नागरिकांना मूलभूत सुविधा मिडत नसल्याचा घणाघात जिल्हाप्रमुख महाजन यांनी केला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सईद मुल्लाजी, बाळू माळी, यशवंत बढे, उमाकांत झांबरे, निलेश काळे, राजु माळी, ताज शहा, अब्रार खान, राहुल वंजारी, अरबाज पहेलवान, पवन माळी, आबा सोनार, अमर सोनार, दिपक पाटील, अस्लम शेख यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन निलेश ठाकूर, संतोष सोनवणे यांनी केले.

  • तुमच्यावर उमेदवार लादणार नाही

वरणगाव, भुसावळ येथील नगरपालिका निवडणुकीत प्रत्येक वॉर्डातील नागरिकांना विचारूनच उमेदवार आम्ही देणार आहोत, तुमच्यावर आम्ही जबरदस्ती कोणताही उमेदवार लादणार नाही. कारण तुमचा उमेदवार तुम्हालाच निवडून द्यायचा आहे. जबरदस्ती कोणताही उमेदवार आम्ही तुमच्यावर लादणार नसल्याचेही जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *