देवगिरी कल्याण आश्रमाच्या वतीने आधार कार्डासाठी उपक्रम देवगिरी कल्याण आश्रम जनजाती समाजाच्या मदतीसाठी नेहमी तत्पर – ॲड जास्वंदी भंडारी (पाटील)


यावल –
तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर आधार कार्ड नोंदणी उपक्रम देवगिरी कल्याण आश्रम भुसावळ जिल्ह्याच्या वतीने घेण्यात आला.
यावल तालुक्यातील डोंगरदे ,विटवा, पैयझरी, कालाडोह, जामुनझिरा रोशनीबर्डी या पाड्यांवरील बऱ्याच जणांकडे आधार कार्ड नव्हते आधार नोंदणी केंद्रावर कार्ड बनविण्यासाठी या लोकांना अनेक अडचणी येत होत्या ‌. लहान मुलांचे ही आधार कार्ड नव्हते ही बाब लक्षात घेऊन देवगिरी कल्याण आश्रमभुसावळ जिल्ह्याच्या वतीने ही अडचण यावल तहसीलदार यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर तहसीलदार यांनी आधार नोंदणीसाठी परवानगी दिली व संबंधित नोंदणी केंद्रांना तसे आदेश दिले. पाड्यांवरील लहान-मोठे असे एकूण 245 लोकांची आधार नोंदणी करण्यात आली.


हा उपक्रम प्रांत उपाध्यक्ष किशोरजी मोरे ,जिल्हा अध्यक्ष डॉक्टर नीलेश भिरुड ,महिला जिल्हाप्रमुख ॲड चित्र आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सह प्रमुख ॲड जास्वंदी भंडारी (पाटील ) कार्यकर्ते वीरसिंग वसावे, सचिव काशीराम बारेला, आरोग्यरक्षक संतोष बारेला , देवसिंग बारेला, दिनेश बारेला, मंगू भिलाला सदस्य सुनंदा खरे, ॲड निलेश भंडारी यांनी मेहनत घेतली तसेच यावल तहसीलदार साहेब,कर्मचारी, नोंदणी केंद्र प्रमुख यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *