भुसावळ –
भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीतील रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ मंगळवारी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र भैय्या पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष नितीन धांडे, वरणगाव राजेंद्र विश्वनाथ चौधरी, भुसावळचे नगरसेवक व गटनेते उपस्थित राहणार आहेत. उपस्थितीचे आवाहन कृउबा सभापती सचिन चौधरी, सचिव नितीन पाटील व संचालक मंडळाने केले आहे.



