जळगाव
महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती पक्ष सलंग्नित प्रहार शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशिय संघटना तर्फे नामदार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांचे वाढदिवसा निमित्त ३० जुन ते ५ जुलै हा “समाजहित- समाजभान ” सप्ताह साजरा करण्यात आला.वाढदिवसाच्या दिवशी अवाढव्य खर्च टाळुन गरजुंना अत्यावश वस्तु व सुविधांचा लाभ व्हावा, कोविड १९ चे महामारीत गरिब जनता वेगवेळ्या संकटांना तोंड देत आहे, या शिबीराचे माध्यमातुन त्यांची थोडी सेवा घडेल या अनुषंगाने वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन अन्नदानाचा उपक्रम राबविन्यात आल्याचे जळगाव जिल्हा आघाडी प्रमुख सौ.राजश्री उमेश नेवे यांनी व्यक्त केले,
दरम्यान सप्ताहांत समाजहित जोपासण्याकरिता विकासदादा घुगे ,कृष्णांत दादा गायकवाड , कृष्णादादा बोदेले ,
यांचे मार्गदर्शन लाभले.
सौ राजश्री नेवे यांच्या सौजन्याने
जिल्ह्यात विविध उपक्रम घेण्यात आले. 5 जुलै रोजी नामदार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांचे वाढदिवसा निमित्त जळगाव येथिल तंड्या भिल वस्तीत
अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला,
प्रसंगी सुमारे ६०-७० परिवारांना खिचडीचे वाटप करण्यात आले, महागडे केक, फुलगुच्छ, मोठमोठी अवाढव्य बॅनर असे खर्च न करता गरजवंतांची गरज ओळखून व भुकेल्याच्या पोटी अन्नाचा घास घालुन साजरा करा असा संदेश बच्चुभाऊंनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना दिला आहे, व त्यांचे आदेशाचे पुरेपुर पालन करीत अन्नदान केल्याचे जिल्हा आघाडी प्रमुख सौ.राजश्री नेवे यांनी सांगितले .
यावेळी जिल्हा अध्यक्षा सौ.राजश्री नेवे , उपाध्यक्षा सौ.माया चौधरी, वंदना झांबरे, सचिन दादा सैंदाणे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.
जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे किसन भाऊ मेथे, हर्षाली पाटील, संजय कुमार सिंग उमेश नेवे यांचे सहकार्य लाभले .



