अँड. मनोहर गायखे यांचे हृदयविकारांच्या तीव्र झटक्याने निधन :

नवी मुंबई :

नवी मुंबई शिवसेना उपजिल्हाप्रमुख व शिव सहकार सेना सरचिटणीस अँड. मनोहर गायखे यांचे वयाच्या 64 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. 

शिवसेनेच्या लोकाधिकार सेनेतून आपल्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीला सुरवात केली होती,.त्यानी शिरूर मतदार संघाचे संपर्क प्रमुख म्हणून काम पहिले होते. लोकाधिकार समितीचे सदस्य म्हणून देखील जबाबदारी सांभाळली होती. अँड. मनोहर गायखे यांच्या निधनाने शिवसेनेने एक अभ्यासू उच्चशिक्षित संघटक गमावला, सगळ्यांना सोबत घेऊन, जाण्याची त्यांची भूमिका असल्याने, राजकारण व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या चाहत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला 

असल्याची भावना अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित शिवसैनिकाकडून व्यक्त करण्यात आली. 

शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा  तीव्र झटका आल्याने त्यांच्यावर सीबीडी येथील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारी अचानक दुपारी त्यांची प्रकृती चिंताजनक बिघडल्याने दुपारी 2 वाजेच्या सुमारास मृत्यू 

झाला.त्यांच्यावर सानपाडा स्मशानभूमीत  अंत्यसंस्कार करण्यात आले. अंतयात्रेत शिवसेनेचे विजय नाहाटा, विजय चौगुले, विठ्ठल मोरे, द्वारकानाथा भोईर, अतुल कुरकरणी, अरविंद नाईक, सुनील काटमोरे, विजय माने, दिलीप घोडेकर एमके मढवी, माजी नगरसेवक, शिवसैनिक पदाधिकारी नातेवाईक उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *