भुसावळात महिलेवर चाकूहल्ला : मुलास केली मारहाण –

भुसावळ –
शहरातील गौसीया नगर भागात सोमवार, 21 जून रोजी
रात्री नऊ वाजता किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर महिलेवर चाकू हल्ला करण्यात आला तर महिलेच्या मुलास चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी मुमताज बी.शेख रशीद (39, गौसीया नगर) यांनी फिर्याद दिल्यावरून फारूक व समीर (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार या सुरत येथे गेल्याने घराला कुलूप होते व त्या गावाहून आल्यानंतर दरवाजा जवळ गुटखा खावून थुंकल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी विचारणा केली असता संशयीतांनी ते थुंकल्याचे कळाल्यानंतर त्यांनी माजी नगरसेवक शेख पापा कालू यांच्याकडे तक्रार केली. यावेळी संशयीत आरोपींनी महिलेच्या डोक्यात चाकू मारला तसेच त्यांचा मुलगा मोहसीन यास चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तपास निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जितू पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *