केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी हेक्टरी एक लाखाची मदत तात्काळ मिळावी – अनिल चौधरींची मागणी ; राज्य प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन सादर ;

रावेर –
जळगाव जिल्ह्यातील रावेर यावल मुक्ताईनगर या तिन्ही तालुक्यांमध्ये मागील महिन्यात
झालेल्या वादळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे केळी पिकांचे सुमारे १०८ कोटी रूपयांची झालेली
नुकसान भरपाई पोटी हेक्टरी एक लाखाची मदत तात्काळ मिळावी अशी मागणी रावेर-यावल विधानसभा मतदार संघातील परिवर्तन मंचचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अनिल चौधरीं यांनी केली असून आज २३ जून बुधवार रोजी राष्ट्रीय कांग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य,प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचेकडे केली. असून प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे आज जिल्हा दौऱ्यावर आले असता यावेळी याबाबत निवेदनहीँ दिले आहे .
जळगाव जिल्ह्यातील रावेर यावल मुक्ताईनगर या तिन्ही तालुक्यांमध्ये मागील महिन्या मध्ये झालेल्या
चक्रीवादळ व पावसासह शेतकऱ्यांचे पिकाची नुकसान मोठ्या प्रमाणात झालेली आहे. या अस्मानी
संकटामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे शासनाने या शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे अत्यंत गरजेचे
आहे. आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात हे आम्ही जवळून पाहिले आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे केळी बागा उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे १०८ कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या
स्थितीत शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आपण संबंधित वरिष्ठाकडे मागणी करून नुकसान भरपाई पोटी हेक्टरी एक लाखाची मदत तात्काळ करावी
जेणेकरून शेतकऱ्यांना परत पेरणीसाठी मदत होईल .
या भागातील शेतकऱ्यांनी वारंवार केंद्र व राज्यशासनाकडे केळीला फळाचा दर्जा मिळण्याचीही मागणी केलेली आहे. या मागणीचा विचार होवून केळीला फळाचा दर्जा दयावा तसेच पंचनामा झाले प्रमाणे शेतकऱ्यांना तातडीने शेती पेरणीसाठी व घर
दुरुस्तीसाठी म्हणून हेक्टरी एक लाख रुपये प्रमाणे त्वरित मदत मिळावी. असे निवेदनात नमूद केले आहे .
दरम्यान रावेर-यावल विधानसभा मतदार संघातर्फे राज्याचे राष्ट्रीय पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे पुष्पगुच्छ देवून अनिल चौधरीं यानी स्वागत केले . यावेळी परिवर्तन मंचचे निलेश सोनवणे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *