महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले उद्या जिल्हा दौर्‍यावर –


जळगाव :-

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर आमदार नाना पटोले हे प्रथमच जळगाव बुधवारी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. बुधवारी पहाटे साडेपाच वाजता भुसावळ येथे त्यांचे आगमन होणार आहे. सकाळी 9 वाजता धनाजी नाना महाविद्यालय येथे केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कायद्याचे दहन आणि यावल, रावेर, मुक्ताईनगर या तालुक्यातील शेतकरी व कार्यकर्त्यांचा मेळावा. सकाळी 11.30 भुसावळातील रामचंद्र सभागृहात तसेच जामनेर, बोदवड तालुक्यातील शेतकर्यांचा मेळावा आणि कार्यकर्ता संवाद, दुपारी एक वाजता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे कोविड सेंटरला भेट व कोविड योध्यांचा सन्मान आणि जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक, दुपारी 3 वा. जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक, सायंकाळी 5 वा. काँग्रेस भवन येथे शहर व ग्रामीणमधील कार्यकर्त्यांशी संवाद, सायंकाळी 6 वा. एरंडोलकडे प्रयाण, रात्री आठ आठता अमळनेर येथे चोपडा, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, पारोळा या तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद, रात्री 9.30 वाजता किसान काँग्रेस बैठक, रात्री 10.30 वा. अमळनेर येथून धुळ्याकडे ते प्रयाण करणार करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *