भुसावळ रेल्वे विभागातर्फे येथील रेल्वे स्कूल येथे योग दिना निमित्त ऑनलाईन योग शिबिर संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी )-

भुसावळ रेल्वे विभागातर्फे येथील
रेल्वे स्कूल येथे योग दिना निमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रेल्वे बोर्ड द्वारा मिळालेल्या आदेशा नुसार विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यात भुसावळ हास्य योगाचे प्रात्यक्षित दिले गेले तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रेल्वे स्कूल मध्ये देखील विद्यार्थ्यांसाठी निबंध चित्रकला, घोष वाक्य प्रतियोगी ते चे आयोजन करण्यात आले. आज ऑनलाईन योग दिवस शिबिरा मध्ये एन बी परदेशी योग शिक्षक यांनी रोज च्या जीवनात उपयोगी योगसनांचे प्रत्याक्षीक करून दाखविले ऑनलाईन माध्यमातून रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या घरूनच यात सहभाग घेतला. विवेक कुमार गुप्ता डी आर एम यांनी या प्रसंगी संबोधन आणि मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सतीश कुलकर्णी प्राचार्य रेल्वे स्कूल आणि एस के उपाध्याय ग्रंथपाल यांनी केले.
ऑनलाईन माध्यमातून ह्या कार्यक्रमात विवेक कुमार गुप्ता डी आर एम, मनोजकुमार सिन्हा, ए डी आर एम,एन डी गांगुर्डे सिनी डी पी ओ , दिलीप खरात डी पी ओ तसेच सर्व शाखा अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन एन डी गांगुर्डे सीनी डी पी ओ यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी साठी देवेंद्र विश्वकर्मा डी बी ए, कार्मिक विभागातील कर्मचारी तसेच रेल्वे स्कूल मधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *