भुसावळ –
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील रहिवासी आकाश चंद्रकांत पाटील ( वय 21) या तरुण युवकाचा जळगाव येथून मोहाडी जवळ असलेल्या कांताई बंधारा येथे दुपारच्या सुमारास मित्रांसोबत पोहण्यास गेलेला आकाशाचा पाण्यात बुडून करुण अंत झाला त्याचे शव जळगाव महानगरपालिकेच्या पथकाने शोध मोहीम राबवून बाहेर काढले
व शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले
आकाश साकेगाव येथील रिक्षा चालक चंद्रकांत पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता आकाश बीकॉम च्या शेवटच्या वर्षाला जळगाव येथील नूतन मराठा कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता तो जळगाव येथे आजीकडे राहत होता ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी आजीला सांगून गेलेला आकाश संध्याकाळी पाण्यात बुडालेल्या ची वार्ता कळाली व परिवारात एकच आक्रोश सुरू झाला
आकाशची आई साकेगाव येथील आरोग्य केंद्रात आशा वर्कर म्हणून कार्यरत आहे त्याचे आई वडील काबाड कष्ट करून मुलाला शिक्षण देत होते व आकाश पुढे चांगले शिक्षण घेऊन परिवाराला आधार देईल अशी आशा त्यांच्या मनात होती मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते आकाश च्या जाण्याने संपूर्ण गावावर व पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्या पश्चात आई वडील बहीण काका काकू आजी असा परिवार आहे
आज अंतयात्रा सकाळी 11 वाजता साकेगाव येथील राहत्या घरून निघणार आहे



