भुसावळ –
पेट्रोलसह डिझेलच्या दरात 25 टक्के कपात करावी, अशी मागणी एमआयएम पक्षातर्फे रावेर व भुसावळ शहरात करण्यात आली. या संदर्भात प्रांताधिकारी तहसील प्रशासनाला पदाधिकार्यांनी निवेदन दिले. वाढत्या इंधन दरवाढीचा पदाधिकार्यांनी प्रसंगी निषेध केला.
भुसावळात निवेदन देताना
ऑल इंडिया मजलिस ए ईत्तेहादुल मुस्लिमीन भुसावळ (रावेर लोकसभा क्षेत्र) रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष फिरोज रहेमान शेख, भुसावळ तालुकाध्यक्ष अशरफ तडवी, जिल्हा महासचिव कलीम शेख, युवा जिल्हा अध्यक्ष नावीद खान, मुजाहिद शेख, शहराध्यक्ष शोएब बागवान, युवा तालुकाध्यक्ष नदीम शेख, युवा शहराध्यक्ष इलियास पटेल, तालुका सदस्य अफजल खान, ग्रामीण अध्यक्ष शोएब शेख, युवा कार्यकर्ता हारीस शेख आदींची उपस्थिती होती.

इंधन दरात 25 टक्के व्हावीत कपात
रावेर-
एम.आय.एम.चे रावेर शहराध्यक्ष वसीम शेख यांच्या नेतृत्वात इंधन दरवाढ कमी करण्याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. पेट्रोल व डिझेल यांच्या दरामधे 25 टक्यापर्यंत दरात कमी करावी, अशी मागणी प्रसंगी करण्यात आली. यावेळी इमरान शेख, सचिव वसीम शेख व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


