59 व्या महाराष्ट्र हौशी मराठी राज्य नाट्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर ; विरेंद्र पाटील लिखीत ‘झेंडूचं फूल’ द्वितीय –

भुसावळ –
भुसावळ येथील स्नेहयात्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील लिखीत ‘झेंडूचं फूल’ या नाटकाला शासनाच्या 59 व्या महाराष्ट्र हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारीतोषिक जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धा अंतर्गत नाट्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून गुरुवारी त्यांना ही माहिती कळवण्यात आली. राज्य नाट्य लेखन स्पर्धेत प्रथम पारीतोषिक (60 हजार रुपये) जयंत पवार यांच्या ‘लिअरने जगावं की मरावं’, द्वितीय पारीतोषिक (40 हजार रुपये) भुसावळचे वीरेंद्र पाटील यांच्या ‘झेंडूचं फूल’, तृतीय पारितोषिक (20 हजार रुपये) शिवाजी करडे यांच्या ‘भावकी’ या नाटकाला जाहीर झाले. नाट्यलेखन स्पर्धेत भुसावळाच्या नाटकाने बाजी मारल्याने जिल्ह्यातील नाट्यप्रेमींनी वीरेंद्र पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *