भुसावळ –
केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, विविध जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) तर्फे रावेर लोकसभा क्षेत्रातील तहसीलदार तसेच प्रांताधिकारी कार्यालयाच्या बाहेर शुक्रवार, १८ रोजी दुपारी तीन वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

पेट्रोलसह डिझेलचे दर २५ टक्के कमी करावेत, या मागणीसाठी एमआयएमचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष फिरोज शेख यांचे नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात येत आहे .



