जळगावातील लाचखोर प्रकल्प अधिकार्‍याची पोलिस कोठडीत रवानगी –


जळगाव –
पीएमईजीपी या शासनाच्या योजनेंतर्गत कर्ज व सबसीडी योजनेचा लाभ मिळण्याचे प्रकरण अपलोड करून हे प्रकरण बँकेस पाठविण्याच्या मोबदल्यात दहा हजारांची लाच मागणार्‍या जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रकल्प अधिकार्‍यास जळगाव एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी लाच स्वीकारताच कार्यालयातच अटक केली होती. संशयीत आरोपी आनंद देविदास विद्यागर (50, रा.अजय कॉलनी, रिंग रोड, जळगाव) यास
बुधवारी जळगाव न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *