रेल्वेने ट्रेन क्र 02811/02812 लोकमान्य टिळक टर्मिनस – हटिया विशेषची साप्ताहिक ते द्वि-साप्ताहिक अशी वारंवारता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशिल पुढे दिलेल्यानुसार :

ट्रेन क्रमांक 02811 विशेष दि. २१.६.२०२१ पासून २८.६.२०२१ पर्यंत दर रविवारी आणि सोमवारी (रविवारी ऐवजी) सुटेल.
ट्रेन क्रमांक 02812 हटिया विशेष दि. १९.६.२०२१ पासून २६.६.२०२१ पर्यंत दर शुक्रवारी आणि शनिवारी (शुक्रवारी ऐवजी) सुटेल.
विशेष ट्रेनची विद्यमान वेळ, थांबे आणि संरचना यात कोणताही बदल नाही.
आरक्षण : 02811 या विशेषच्या वाढीव वारंवारतेचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. १७.६.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
वरील विशेष अतिजलद ट्रेनच्या ठिकाणांच्या विस्तृत माहितीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


