वरणगाव –

भुसावळ तालुक्यातील फुलगाव जवळील अपघाताची मालीका गेल्या तीन दिवसापासुन सुरुच असुन दि १५ मंगळवार रोजी पुन्हा अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघात झाल्याने त्यात एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली
या बाबत वृत असे मागील तीन दिवसा पासुन नव्याने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा उड्डान पुलाला समातर रस्ता नसल्याने या ठिकाणी अपघात होत आहे असेच पुन्हा मंगळवार दि १५ रोजी नेर (शाहापुर ) जि बऱ्हाणपुर ( म प्र) येथील रहिवाशी असलेले नामदेव हरि प्रजापती ( कुंभार ) व त्यांचा मुलगा रामकृष्ण नामदेव प्रजापती (कुंभार ) हे त्यांच्या शेतात हतनूर धरणाची माती टाकल्याने जे सी बी मशिनवाल्यास पैसे देण्यासाठी वरणगाव येथे आपल्या मोटरसायकल क्र एम पी १२ एम एच ३९३६ ने आले होते पैसे दिल्या नतंर फुलगाव येथे नातेवाईक असल्याने भेट घेण्यासाठी गेले होते मात्र घरी परत जाण्यासाठी निघाल्या नतंर उड्डान पुला जवळ मागुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलीस जबर धडक दिल्याने मुलगा व वडील खाली फेकल्या गेल्येने ते जखमी झाल्याने त्यांना तत्काळ वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरानी नामदेव प्रजापती यांची तपासनी करून मृत घोषीत केले तर रामकृष्ण प्रजापती हे किरकोळ जखमी झाल्याने त्याच्यावर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले
या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला मुलगा रामकृष्ण प्रजापती यांच्या खबरीनुसार अज्ञात वाहना विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन घटनेचा पुढील तपास पो हे कॉ नावेद अली पठाण हे करीत आहे
असे किती अपघात होण्याची रस्ता तयार करणारी कंपणी वाट बघत आहे त्या नंतर समातर रस्ता तयार करणार व मार्गदर्शक सुचना फलक कधी लावणार जेणे करुण भविष्यात अपघात होणार नाही


