जळगाव –
जळगाव जिल्ह्यात आज केवळ ६४ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर १५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजच्या रुग्ण वाढ नंतर जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १ लाख ४१ हजार ६५८ इतकी झाली आहे. त्यापैकी १लाख ३७ हजार ३६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आजची आकडेवारी
जळगाव शहर-०२, जळगाव ग्रामीण-०५, भुसावळ-०५, अमळनेर-०५, चोपडा-०५, पाचोरा-०४, भडगाव-०१, धरणगाव-०३, यावल-०३, एरंडोल-०२, जामनेर-०४, रावेर-०६, पारोळा-०४, चाळीसगाव-०८, मुक्ताईनगर-०१, बोदवड-०३ आणि इतर जिल्ह्यातील ०२ असे एकुण ६४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.


