जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रकल्प अधिकाऱ्याला लाच घेतांना पकडले


जळगाव –
जिल्हा उदयॊग केंद्राचे प्रकल्प अधिकारी यांना आज मंगळवार लाभार्थ्यांकडून १० हजार रुपयांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
भुसावळ येथील तक्रारदार पुरुष लाभार्थ्याने या प्रकल्प अधिकाऱ्यां विरोधात तक्रार दाखल केली होती त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली .
आरोपी आनंद विद्यागर, (वय-५०, प्रकल्प अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्र रा.अजय कॉलनी,रिंग रोड, जळगाव ) यांनी लाच स्वीकारलेली रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
तक्रारदार हे सुशिक्षीत बेरोजगार असुन त्यांनी पीएमईजीपी (PMEGP) या शासनाच्या योजने अंतर्गत कर्ज व सबसिडी योजनेचा लाभ मिळणे कामी तक्रारदार यांचे प्रकरण अपलोड करून बँकेस पाठविण्याच्या मोबदल्यात आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 10,000/-₹ लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम मागणीप्रमाणे त्यांनी स्वत: पंचासमक्ष जिल्हा उद्योग केंद्र,कार्यालय येथे स्वीकारली. पोलीस उप अधीक्षक
सतीश डी.भामरे, यांनीं हा सापळा रचण्यासाठी मार्गदर्शन केले . सापळा पथकात पो नि
संजोग बच्छाव, स फौ. दिनेशसिंग पाटील, पो हे कॉ. अशोक अहीरे, पो हे कॉ. सुनिल पाटील, पो हे कॉ. रविंद्र घुगे, पो ना. मनोज जोशी, पो ना. सुनिल शिरसाठ, पो ना. जनार्धन चौधरी, पो कॉ. नासिर देशमुख, पो कॉ. ईश्वर धनगर, पो कॉ. प्रदिप पोळ, पो काॅ. महेश सोमवंशी यांचा समावेश होता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *