अज्ञात वाहनाच्या धडकेत फुलगावच्या युवकाचा मृत्यू –

वरणगाव : अज्ञात वाहनाने मोटारसायकला मागून धडक दिल्याने फुलगावच्या युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजता घडली. अपघातामुळे महामार्ग सुमारे चार तास ठप्प झाला होता. या अपघातात राकेश पांडुरंग चौधरी (२९, फुलगाव) या तरुणाचा मृत्यू झाला.
फुलगाव येथील राकेश पांडुरंग चौधरी (२९) हा तरुण भुसावळकडून फुलगावकडे दुचाकी (एम.एच.१९ डि.क्यु. ६३९३) ने येत असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अरविंद नारायण कुरकुरे (३८, हनुमान नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर पाटील व अतुल कुमावत तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *