मुक्ताईनगर –

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तसेच युवासेना प्रमुख शिवसेना नेते ना. आदित्यठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय येथे #मराठाचेंबर्सऑफ_कॉमर्स यांचे वतीने .ना. आदित्य ठाकरे (पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांनी सुचविल्याप्रमाणे चार बाय पॅप ( BI-Pap) मशीन ट्रॉली सहित भेट स्वरूपात दिले. यांचे लोकार्पण शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे, डॉ. नम्रता अच्छा, शिवसेना तालुका प्रमुख श्री. छोटूभाऊ भोई, शहरप्रमुख श्री. गणेश टोंगे, गटनेता राजू हिवराळे, युवासेना तालुका प्रमुख पंकज राणे, हरी माळी यांच्यासह रुग्णालयाचे अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.


