मुलांनाही पर्यावरणाची जाणीव व्हावी – शहराध्यक्ष शालिनी वाढेकर ; महिला पर्यावरण मंचच्यावतीने भुसावळात चिमुकल्यांसाठी कार्यशाळा संपन्न ;


भुसावळ
कोरोणा काळात आपणा सर्वावर फार मोठे संकट ओढावले, या संकटात ऑक्सीजनचे महत्व सर्वानाच समजेल ,या पार्श्वभूमिवर वृक्ष संगोपन किती महत्वाचे आहे , व भविष्यात पुन्हा अश्या प्रकारचे संकट येवू नये , मुलांमध्ये वृक्ष लागवडीची आवड निर्माण व्हावी मुलांना निसर्ग व पर्यावरणाची जाणीव व्हावी यासाठी सीडबॉल व रोपे कसे तयार करावे याचे ज्ञान व्हावे याकरीता अश्या कार्यशाळांचे जास्तीत जास्त आयोजन होऊन घेण्यात याव्या असे आवाहन येथील महिला पर्यावरण मंचच्या शहराच्या अध्यक्ष शालिनी वाडेकर यांनी केले .
येथील महिला पर्यावरण मंचच्या शहर कार्यकारिणी द्वारा नुकतेच पिकेपी नगरातील पोलीस पाटील मधुकर पाटील यांच्या शेतात चिमुकल्यांसाठी कार्यशाळा संपन्न मुलांसाठी कार्यशाळ

करण्यात आले होते. यावेळी शालिनी वाडेकर बोलत होत्या .
प्रसंगी राज्य समन्वयक नाना पाटील यांनी कार्यशाळा घेण्याचा उद्देश आणि मुलांमध्ये जनजागृती का करावी याबाबत मार्गदर्शन केले. तर कार्याध्यक्ष आरती चौधरी यांनी मुलांमधील असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी नकली (क्ले क्ले) माती माती खेळण्यापेक्षा प्रत्यक्ष (सीड बॉल) बी बियाणे वापरून मातीचे गोळे , कशे करावे ,रोपे कशी करावी याची प्रत्यक्ष माहिती देत त्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले .तसेच अश्या प्रकारच्या कार्यशाळा का आवश्यक आहे यांची सविस्तर माहिती देत अनुभव सांगितले .
या कार्यशाळेत
मुलांमध्ये जनजागृती होऊन जिज्ञासा निर्माण झाली. याअनुषंगानेकार्यशाळेत विविध स्वरूपाच्या बिया निंबुडी ,बदाम ,बोरी, सीताफळ ,चिकू, आंबे ,सुबाबुळ ,भोकर अशा कितीतरी बियांचे सीड बॉल तयार करून मुलांना त्या बियांची व काही रोपांची माहिती देण्यात आली यावेळी मुलांनी 575 सीड बॉल बनवून विविध स्वरूपाची जवळपास 100 रोपे बनविले . सीड बॉल बनविताना मुलांचा आनंद चेहऱ्यावर ओसंडत होता. या कार्यशाळेत सिमरन, कुणाल ,स्वरूप ,आयुष ,उत्कर्ष, हंसिका, नक्षत्रा, श्याम ,यथार्थ, प्रशांत ,जागृत या बाल गोपाळ चिमुकल्या सोबत पालक तथा संस्थेचे पदाधिकारी विद्या पाटील , शालिनी वाढेकर ,आरती चौधरी ,स्वाती भोळे, श्रद्धा महाले, शितल अरोडा, प्रियंका चौधरी, सारिका फालक, विजया निकम,, योगिता कासार, भारती चव्हाण कुणाल चौधरी, सीमा डोलारे ,काजल सेन यांनी सहभाग घेवून या कार्यशाळेसाठी विविध स्वरूपात सहकार्य केले .
कार्यशाळेत
पोलीस पाटील, मधुकर मधुकर दादा पाटील यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते . कार्यशाळेला जागृत याचे मोलाचे सहकार्य लाभले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *