शिवसेना उपजिल्हाप्रमुख ऍड. श्याम श्रीगोंदेकर यांचा राजीनामा ;


भुसावळ –
शिवसेना उपजिल्हाप्रमुख ऍड. श्याम श्रीगोंदेकर यांचेवर झालेल्या अन्यायामुळे त्यांनी पदाचा राजीनामा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचेकडे
दिला आहे .
निवेदनात नमूद आहे की, हिंदू हृदय सम्राट श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने
प्रेरीत होवून गेल्या 30 वर्षापासून मी शिवसेनेत पक्षा करीता पक्षाने दिलेल्या पदावर कार्य करीत आहे. तसेच पक्षाने दिलेली जबाबदारी एकनिष्ठपणे पार पाडली आहे.परंतु अलिकडच्या काळात पक्षाने रावेर लोकसभा मतदार संघातील नुतन जिल्हा प्रमुखांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. सदरच्या नियुक्त्या माझ्यावर अन्यायकारक आहे. यामुळे माझ्या एकनिष्ठेचा घात झाला असून माझ्यावर अन्याय
झालेला आहे.
त्यामुळे मी शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदाचा १० जून रोजी स्वखुशीने राजीनामा
देत आहे. सदर नियुक्तयांमुळे राजीनामा देताना मी अतिशय दुःखी व व्यथित असल्याने नाईलाजास्तव राजीनामा देत असल्याचेही गोंदेकर यांनी म्हटले असून पक्षप्रमुख यांचेसह सर्व सम्बंधिताना राजीनामा प्रत रवाना केली आहे .
सदर राजिनाम्यामुळे शहरासह जिल्ह्यातील जुने जाणकार निष्ठावान शिवसैनिक नाराज झाले असून शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *