जळगाव –
रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करून त्यांची विक्री केल्याप्रकरणी जळगावच्या खान्देश कॉम्लेक्समधील महालक्ष्मी टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल दुकानातून पथकाने सहा हजार 733 रुपयांची तिकिटे जप्त केली. या प्रकरणी महालक्ष्मी टुर्सचे मालक संजय मोतीराम चौधरी (53) अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रेल्वे तिकिट विक्री करण्याचा पनवाना नसताना तिकीटांची विक्री सुरू असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. भुसावळच्या रेल्वे वाणिज्य विभागाचे एटीएस पथकातील मुख्य तिकिट निरिक्षक हेमंत सावकारे, मुख्य तिकिट निरीक्षक ए.एस.राजपूत, उपमुख्य तिकीट निरीक्षक प्रशांत ठाकूर व जळगावचे रेल्वे सुरक्षा बलाचे निरिक्षक सी.एस.पटेल यांच्या पथकाने ही कारवाई केली.



