भुसावळ :

शहरातील प्रभाग क्रमांक सातमधील रींग रोडच्या कार्पेट कामाला सुरूवात झाली असून आमदार संजय सावकारे यांनी शुक्रवारी कामाची पाहणी केली. याप्रसंगी ठेकेदाराला त्यांनी कामाचा दर्जा राखण्याची सूचना केली. प्रसंगी बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एस.यु.कुरेशी, नगरसेवक युवराज लोणारी, राजेंद्र नाटकर, माजी नगरसेवक निक्की बत्रा, सामाजिक कार्यकर्ते सतीश सपकाळे, अजय नागराणी, गिरीश महाजन, विशाल जंगले आदी उपस्थित होते.


