मुंबई – नागपूर दरम्यान एकमार्गी (वन वे) अतिजलद विशेष गाड्या ;


भुसावळ –
मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पूर्णतः आरक्षित अतिजलद विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालविण्याचा निर्णय घेतला आहे.  तपशिल पुढील प्रमाणे :

 १. दादर- नागपुर विशेष अतिजलद (वन वे)
 01369 विशेष दादर येथून दि. ११.६.२०२१ रोजी २०.०५ वाजता सुटेल आणि  नागपुर येथे दुसर्‍या दिवशी १०.३० वाजता पोहोचेल.
थांबे : नाशिक, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा

आरक्षण : 01369 या गाडीचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. ११.६.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष गाडीच्या तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.  
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.  
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *