शेतातून घरी परतणाऱ्या मजुरांच्या अंगावर वीज कोसळली ; १० जण जखमी ;


रावेर –

तालुक्यातील जिन्सी येथे शेतातून घरी परतणाऱ्या मजुरांच्या अंगावर वीज पडून १० जण जखमी झाल्याची घटना आज बुधवार रोजी दुपारी घडली .

पाऊस सुरु असतांना शेतातील काम आटोपुन घरी निघालेल्या मजूरांच्या अंगावर अचानक विज कोसळली. यामध्ये बळीराम दल्लू पवार (वय-२१) दिलीप लक्ष्मन पवार (वय-२१), अरविंद साईराम पवार (वय-१५), ईश्वर दल्लू पवार (वय १५), कमलसिंग लक्ष्मण पवार (वय २०), अनिल लक्ष्मण पवार (वय २७), बिंदुबाई लक्ष्मण पवार (वय ५०), साईराम मोरसिंग पवार (वय-३७), मलखान मोरसिंग पवार (वय ४५), लक्ष्मण मोरसिंग पवार (वय ५५) हे जखमी झाले असून त्यांच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *