जळगाव :

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. नव्या रुग्णांसह जिल्ह्यात मृताचा आकडाही घटू लागला असल्याने दिलासादायक बाब आहे. आज शनिवारी दिवसभरात १६६ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज ३९७ कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या २४ तासात ०४ जणांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या रुग्ण वाढीसह जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ३९ हजार ६६६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ लाख ३० हजार ९५१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच ४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २५२४ वर गेला आहे.तर उर्वरित ६ हजार १९१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
असे आढळले रुग्ण
जळगाव शहर-१४, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-१६, अमळनेर-०, चोपडा-३, पाचोरा-७, भडगाव-० , धरणगाव-०, यावल-१०, एरंडोल-६४, जामनेर-१४, रावेर-३, पारोळा-८, चाळीसगाव-१९, मुक्ताईनगर-२, बोदवड-२ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १६६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.


