राष्ट्रवादीचे नेते हाजी गफ्फार मलिक यांच्या पार्थिवावर दफनविधी –
जळगाव (प्रतिनिधी )-
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी गफ्फार मलिक यांचे सोमवारी निधन झाल्यानंतर मंगळवारी दुपारी शोकाकुल वातावरणात पार्थिवावर दफनविधी करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अल्पसंख्यांक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले होते.
मंगळवारी राहत्या घरून हाजी गफ्फार मलीक यांचे पार्थिव एका वाहनातून दफनभूमीत नेण्यात आले. याप्रसंगी आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी समाजबांधवांची मोठी गर्दी झाली. दुपारी ईदगाह मैदानाजवळच्या दफनभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार (दफनविधी) करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी हाजी गफ्फार मलिक यांना आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी उपमहापौर करीम सालार, ज्येष्ठ नगरसेवक सुनील महाजन, इकरा कॉलेजचे माजी प्राचार्य इकबाल शहा यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.



