भुसावळात दिड लाखांची चोरी : चोरटा पोलिसांच्या जाळ्यात –

भुसावळ (प्रतिनिधी )-
दुकानाचे शटर वाकवून दुकानाच्या ड्रावरमधील सुमारे दिड लाखांची रोकड लांबवण्यात आल्याची घटना गेल्या महिन्यात 14 रोजी घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी दाखल गुह्यातील आरोपीला सीसीटीव्हीच्या आधारे अटक केली आहे.
जळगाव रोड जुना सातारा मरीमाता मंदिरा जवळील राहत्या घराच्या खालच्या मजल्यावर असलेल्या ज्ञानदीप सुपर शॉपीचे अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर वाकवून काउंटरमधील दीड लाखांची रोकड चोरट्याने लांबवली होती. ही घटना 14 एप्रिल रोजी रात्री घडली होती.
सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चोरट्याची छबी कैद झाल्यानंतर आरोपी कृष्णा पन्नालाल धोबी 26, रा.महात्मा फुले नगर, भुसावळ यास अटक आहे.
पोलिसांनी अटक केली.
शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय सोनवणे, सचिन चाटे, इसराइल खाटीक यांनी ही कारवाई केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *