भुसावळ (,प्रतिनिधी )-
महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाचा बुलंद आवाज तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
अल्पसंख्यांक माजी प्रदेशाध्यक्ष शिक्षण सम्राट मा.हाजी अब्दुल गफ्फार मलिक साहेब यांचे दुःखद निधन झाले आहे.
अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावून जाणारी बातमी. प्रत्येक समाजाला आपलंसं वाटणारे साहेब आज नाहीत ह्या गोष्टीवर विश्वास बसत नाही.
हाजी साहेबांनी उत्तर महाराष्ट्रातील मुस्लीम युवक-युवतींच्या उच्चशिक्षणासाठी व औद्योगिक प्रशिक्षणासाठी आयुष्यभर अथक परिश्रम केले.
कोविडकाळात आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वयमान विसरून समाजसेवा केली,नेहमी गोर गरीब जणतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे,
राम आयेगे न रहीम आयेगे, इंसान ही इंसान के काम आयेगे. असे प्रतेक वेळी आपल्या भाषणातून संदेश देणारे आपले हाजी साहेब आज आपल्यातुन हरपले आहे!
अश्या या लोक नेत्यास !
भावपूर्ण श्रद्धांजली .आम्ही हाजी साहेब यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत! अशी माजी आमदार संतोष चौधरीं यांनी गफ्फारभाई मलिक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.



