भुसावळ –
रेल्वेने पश्चिम बंगाल राज्यांमध्ये येणाऱ्या “यास” चक्रीवादळच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने पुढील गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशिल पुढे दिलेल्यानुसार:
1) ट्रेन क्रमांक 02279 पुणे हावडा विशेष दि. २४.५.२०२१ आणि २५.०५.२०२१ रोजी सुटणारी आणि
ट्रेन क्रमांक 02280 हावडा पुणे विशेष दि. २५.५.२०२१ आणि २६.०५.२०२१ रोजी सुटणारी.
2) ट्रेन क्रमांक 02833 अहमदाबाद हावडा विशेष दि. २५.५.२०२१ आणि २९.०५.२०२१ रोजी सुटणारी आणि
ट्रेन क्रमांक 02834 हावडा अहमदाबाद विशेष दि. २५.५.२०२१ आणि २६.०५.२०२१ रोजी सुटणारी.
3) ट्रेन क्रमांक 02809 मुंबई हावडा विशेष दि. २४.५.२०२१ आणि २८.०५.२०२१ रोजी सुटणारी आणि
ट्रेन क्रमांक 02810 हावडा मुंबई विशेष दि. २५.५.२०२१ आणि २६.०५.२०२१ रोजी सुटणारी.
4) ट्रेन क्रमांक 02259 मुंबई हावडा विशेष दि. २५.५.२०२१ रोजी सुटणारी आणि
ट्रेन क्रमांक 02260 हावडा मुंबई विशेष दि. २६.५.२०२१ रोजी सुटणारी.
5) ट्रेन क्रमांक 02905 ओखा हावडा विशेष दि. ३०.५.२०२१ रोजी सुटणारी आणि
ट्रेन क्रमांक 02906 हावडा ओखा विशेष दि. २५.५.२०२१ रोजी सुटणारी.
6) ट्रेन क्रमांक 02255 लोकमान्य टिळक टर्मिनस कामख्या विशेष दि. ३०.५.२०२१ रोजी सुटणारी
रेल्वेने खाली दिलेल्या तपशिलानुसार पार्सल ट्रेनचे रद्दीकरण देखील निश्चित केले आहे
1) 00113 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – शालिमार पीसीईटी दिनांक २४.५.२०२१ व २७.५.२०२१ रोजी सुटणारी आणि
00114 शालिमार – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई पीसीईटी दिनांक २५.५.२०२१ आणि २६.५.२०२१ रोजी सुटणारी.

2) 00123 सांगोला – शालिमार पीसीईटी दि. २५.५.२०२१ रोजी सुटणारी आणि
00124 शालिमार – सांगोला पीसीईटी दिनांक २७.५.२०२१ रोजी सुटणारी.
(PCET – Parcel Cargo Express Train)
प्रवाश्यांनी कृपया याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले .
–


