भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ महिला क्रिडा मंडळातर्फे नुकतीच ऑन लाइन फोटो चारोळी स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेस महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.स्पर्धेकरीता आई व बाळ असा विषय होता.
स्पर्धेत सहभागी करीता पुढील निकष लावण्यात आले.यात फोटोतील भावना व त्यावरील चारोळी यांच्यातील परस्पर संगती, चारोळी शक्यतोवर स्वरचित असाव्या , फोटोचा लक्षवेधीपणा,त्यातील भावनांचे नैसर्गिक आणि उत्स्फूर्त प्रकटीकरण, आकर्षकपणा. ह्या मुद्द्यावर निवड करण्यात आली
या साठी दोन ग्रुप करण्यात आले होते एक मंडळातील मेंबर्स व दुसरे मंडळा बाहेरचे स्पर्धक होते.
हे सर्व फाटो व कविता पुण्याला परीक्षणासाठीं पाठवण्यात आल्या होत्या. बक्षिसे विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे..
ग्रुप – ए..
जयश्री दवे, उज्ज्वला राणे, अनिता कवडीवाले, स्वाती नाईक, लता होसकोटे, जयश्री ओक, किरण शुक्ला
ग्रुप- बी..
भारती चौहान, नेहा नाईक, धनश्री भिरुड, अलका ढाके, डॉ. उर्मी ठक्कर
सगळ्यांचे अभिनंदन करण्यात आले. लाॅकडाउन संपल्यावर बक्षिस समारंभ होईल असे महीला क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा सौ. आरती चौधरी यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पुण्याच्या सौ. स्मिता जोगळेकर व सौ. संगिता शेवटे यांनी काम बघितले . यावेळी
सर्व स्पर्धकांना त्वरीत ई-सर्टीफिकेट देण्यात आले.



